पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : अष्टपैलू आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेला 'जगन्मित्र' जमिल

जमिल शेख

"कमी तिथे आम्ही" हा आगळा वेगळा मंत्र सतत जपणं फारसं कुणाला जमत नाही. पण आज ज्या कलाकाराचा वाढदिवस आहे, तो तर या मंत्राचा सदोदीत जपच करत असतो जणू. त्याचं नाव "जमिल शेख". आज लाईट करायला कुणी नाहीये काय करायचं ? जम्या आहे ना. म्युझिक ऑपरेटर नाहीये, जम्या आहे ना. सहकलाकार नाहीये, जम्या आहे ना. नाटकाच्या वेळेला कुठलीही अडचण आली तरी हसत हसत त्याच्यावर तोडगा काढणं जमीलला सहज शक्य होतं. 

जयंती विशेष : गायनावर नि:स्सीम प्रेम करणारे थोर गायक

एम्. इ. एस. गरवारे प्रशालेत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बी. एम्. सी. सी. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम, फिरोदिया या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये नाटकाच्या सर्व क्षेत्रात तो चौफेर कामगिरी करायचा. लाईट ऍडजस्ट कर, स्पिकरची पोझिशन नीट कर, कलाकारांना मेकअप कर, सेट लाव हे सगळं करून एखादी छोटी मोठी भूमिकाही तो करायचा. हे झालं स्वतःच्या महाविद्यालयाचं, दुसऱ्या महाविद्यालयातल्या कलाकारांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यावरही तोडगा काढायला हा पुढे असायचा. थोडक्यात सांगायचं तर, नाट्यक्षेत्रातला तो "नारायण" आहे. बोलट, एन इन्वेस्टीगेशन, होळी इनव्हॉल्व्हमेंट फँटसी, गप्पा, वन सेकंडस लाईफ अशा अनेक एकांकिका त्याने आपल्या अष्टपैलूत्वाने गाजवल्या. 

मस्तानीबाईंविषयीच्या त्या संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजाचा आक्षेप

पुढे, 'टूरटूर', 'ऑल लाईन क्लिअर', अशा "फुलराणी" रंगभूमीच्या अनेक व्यावसायिक नाटकांमधे त्याने चमकदार भूमिका करून रसिकांची मनं जिंकली. "एन इंटरव्हल" या नाटकासाठी तर तो ऐन वेळेला रिप्लेसमेंट म्हणून उभा राहिला, ज्यात त्याने सुमारे २५ वेगवेगळ्या भूमिका अप्रतिमपणे वठवून रसिकांचे प्रेम मिळवलं. "विच्छा माझी पुरी करा" या लोकनाट्यातली बहारदार बतावणी त्याने प्रसाद ओक, सतीश तारे, सुनिल तारे, सिद्धेश्वर झाडबुके, आनंद जोशी अशा अनेक कलाकारांबरोबर शाहीर, लेखक, भट अशा वेगवेगळ्या भूमिका करून गाजवली आहे. आता तर झोपेतून उठवलं तरी तो उत्तम बतावणी सादर करू शकतो. हा उत्कृष्ठ कलाकार एक उत्तम "संकलक" सुद्धा आहे. स्मिता तळवलकर ह्यांच्या अनेक मालिकांचं उत्तम एडिटिंग त्याने केलं आहे. अशा या सतत हसतमुख असणाऱ्या, कुठल्याही अडचणींवर सहज मात करणाऱ्या, जगन्मित्र  असणाऱ्या अष्टपैलू, हजरजबाबी कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देविका साकारतेय 'गर्ल्स'मधली शिस्तीची तितकीच मायाळू 'आई'