पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday Rekha : 'आईनं बळजबरीनं पाठवलं होतं चित्रपटसृष्टीत'

रेखा यांचा पहिला चित्रपट

बॉलिवूडमधलं सहाबहार व्यक्तीमत्व अभिनेत्री रेखा यांचा आज ६५ वा वाढदिवस. त्यांच्या आरसपानी सौंदर्याची भुरळ आजही त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या आहे. सौंदर्याची अमुल्य देणगी लाभलेल्या रेखा यांचं आयुष्य अनेक चढ- उतारांनी भरलं आहे. आयुष्यात आलेली अनेक दु:ख, संकटं पचवून आजही त्या कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. 

तामिळनाडूतील चेन्नईमध्ये १० ऑक्टोबर १९५४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन. रेखा यांचे वडील तामिळमधले सुपरस्टार जेमिनी गणेशन होय. पण लहाणपणी रेखा यांना वडिलांचे प्रेम मिळालेच नाही. वडिलांनी पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. रेखा यांच्या आईही तामिळ चित्रपटात काम करायच्या. चेन्नईमध्ये वाढलेल्या रेखा यांच्यावर लहानपणी कुटुंबाची जबाबदारी आली.  कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांना इच्छा नसतानाही चित्रपटसृष्टीत काम करावं लागलं होतं. 

हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं रचले हे दहा विक्रम

१९६६ साली वयाच्या बाराव्या वर्षी ‘रंगुला रत्नम्’ या तेलगू चित्रपटातून त्यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे आर्थिक परिस्थिती अस्थिर होऊ लागली होती म्हणून रेखा यांच्या आई पुष्पावल्ली यांनी नशीब आजमावण्यासाठी रेखा यांना चित्रपटसृष्टीत ढकलले असंही म्हटलं जातं. नाईलाजानं त्यांनी अभिनय क्षेत्र स्विकारलं आणि जाबाबदारीच्या ओझ्याखाली त्यांचं बालपण कोमेजून गेलं. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना प्रौढ अभिनेत्रीची भूमिका साकारावी लागली होती. ओपरेशन जॅकपॉट नल्ली सी. आय. डी. ९९९ या कन्नड चित्रपटात त्यांनी केवळ १५ व्या वर्षी मोठी भूमिका साकरली होती. 

चार वर्षांनी ‘डॅडी’ दगडी चाळीत

मला चित्रपटसृष्टीत करिअर घडवायचं नव्हतं मात्र आईनं बळजबरीनं मला या क्षेत्रात पाठवलं, असं रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.