पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा

बॉलिवूडमधलं आरसपानी सौंदर्य आणि सदाबहार व्यक्तीमत्त्व असलेल्या रेखा यांचा आज ६५ वा वाढदिवस. वयाच्या १२ व्या वर्षी आईच्या सांगण्यावरुन इच्छा नसतानाही त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘रंगुला रत्नम्’ हा त्यांचा पहिला चित्रपट होय.

तामिळ चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरूवात केलेल्या रेखा या वयाच्या १५ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळल्या. त्यांनी १९६९ मध्ये 'अंजाना सफर' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात काम करताना त्यांना विचित्र अनुभवाला सामोर जावं लागलं होतं. या चित्रपटातील त्यांचे सहकलाकार विश्वजीत चटर्जी हे वयानं त्यांच्यापेक्षा मोठे होते, तर रेखा या केवळ १५ वर्षांच्या होत्या. 

'आईनं बळजबरीनं पाठवलं होतं चित्रपटसृष्टीत'

चित्रपटातील गाण्यात चुंबनदृश्य होतं. विश्वजित यांनी बळजबरीनं अनेकदा रेखा यांचं चुंबन घेतलं. चित्रीकरण पाहण्यासाठी आलेले अनेक लोक आणि चित्रपटाची टीम शिट्ट्या टाळ्या वाजवून विश्वजित यांना उत्तेजन देत होती. चित्रपटात  प्रौढ भूमिका साकारणाऱ्या अल्पवयीन रेखा यांना सर्वांसमोर ओशाळल्यागत झालं होतं.

नाना पाटेकर लवकरच दिसणार चित्रपटात

हे प्रकरण खूपच गाजलं होतं. सेन्सॉर बोर्डानं चुंबन दृश्य चित्रपटातून हटवण्याचा प्रयत्नही केला होता. हा सारा  प्रसंग रेखा यांच्या जीवनावर आधारित  यारिस यस्मान यांच्या 'रेखा : अॅन अनटोल्ट स्टोरी' या चरित्रात वाचायला मिळतो. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Happy Birthday Rekha Biswajeet forcibly kissed her several times while shooting a romantic scene