पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे मेघ'राज'

मेघराज राजेभोसले

मेघराज राजेभोसले एक मितभाषी, तरुण, उमदे व्यक्तिमत्व. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या कलाक्षेत्रातील दोन्ही अत्यंत महत्वाच्या संस्थांचे अध्यक्ष. अत्यंत तळमळीने तंत्रज्ञ आणि कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा हा माणूस तुम्हाला कधीच स्वस्थ बसलेला दिसणार नाही. 

Happy Birthday : मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीमधला 'चॉकलेट बॉय'

सतत काही ना काही विचार डोक्यात चालूच असतात. मग त्यातूनच ऑडिशनच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचा नियम, कास्टिंग काऊचच्या विरुद्धची मोहीम, पडद्यामागील कालाकारांसाठीचे पुरस्कार असे नवे नवे उपक्रम राबविण्याची कल्पना यांच्या मेंदूतून निघते आणि त्यामुळेच अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. 'जाऊ तिथे खाऊ' ह्या लोकप्रिय चित्रपटाचे निर्माते. 'जाऊ तिथे खाऊ' याच नावाने एका अत्यंत वेगळ्या विषयावरील सुंदर नाटकाचीही त्यांनी निर्मीती केली. त्यांच्या पांडव या संस्थेने 'चौफुला', 'हीच ती शुक्राची चांदणी' असे लोककलांचे मनोरंजक कार्यक्रम, तसेच 'पती सगळे उचापती', 'लंडनची सुन इंडियात हनिमून', 'घाशीराम कोतवाल', 'दिवसा तू रात्री मी' अशा अनेक नाटकांची निर्मिती केली आहे

जाणून घ्या 'फत्तेशिकस्त'ची एका आठवड्याची कमाई

चित्रपट मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्वांच्या हिताकरता काही महत्वपूर्ण निर्णय घेऊन सर्वांचे शुभाशिर्वाद प्राप्त केले. नाट्य परिषदची आत्ताची कार्यकारिणीही त्यांच्या अध्यक्षतेखाली रंगकर्मींसाठी व रसिकांसाठी उत्तम कार्य करण्यासाठी कार्यरत आहे. अशा या सतत हसतमुख असणाऱ्या, कुठल्याही कामाला कंटाळा न करता पुढे असणाऱ्या सुस्वभावी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.