पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीमधला 'चॉकलेट बॉय'

भूषण प्रधान

पुण्याच्या कमलनयन बजाज शाळेत, "वाढदिवसाची भेट" या नाटकाने भूषणने आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळेला तो आठ वर्षांचा होता. आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने त्याने सर्वांचीच मनं जिंकली आणि अभिनय क्षेत्रातच प्रगती करायची असं त्याच्या मनानं ठरवलं आणि घरच्यांनीही त्याला पाठिंबा दिला. सिम्बायोसिस महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत असताना त्याने पुरुषोत्तम करंडक आणि अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या. वाणिज्य शाखेची पदवी संपादन केल्यानंतर त्याने एमबीए केले. दरम्यान मालिका, नाटक आणि चित्रपट यामध्ये भूमिका मिळवण्याचे त्याचे स्ट्रगल चालूच होते. "हॅम्लेट" या अत्यंत गाजत असलेल्या नाटकातील 'लीआर्टिस' ही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका त्याने आपल्या उत्तम अभिनयाने अक्षरशः जिवंत केली. त्याने या भूमिकेसाठी घेतलेली प्रचंड मेहनत त्याच्या अभिनय प्रवासाला बळकटी देणारी ठरली. 

जाणून घ्या 'फत्तेशिकस्त'ची एका आठवड्याची कमाई

'पिंजरा' या मालिकेने रसिकांच्या घराघरात पोहोचलेल्या भूषणने साकारलेला 'वीर' अल्पावधीतच अनेक तरुणींच्या 'दिलाची धडकन' बनला. 'सतरंगी रे', 'रे राया', 'तू तिथे असावे', 'आम्ही दोघी', 'ढिनचाक एंटरप्राइज', 'शिव्या', 'निवडूंग', 'टाईम बरा वाईट','मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आणि त्याने साकारलेल्या या भूमिका रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्रही ठरल्या. 'गोंदया आला रे..' ह्या वेबसीरीज मध्ये त्याने 'दामोदर हरी चापेकर' यांची महत्वपूर्ण भूमिका अत्यंत समरसून केली त्यामुळेच सर्व रसिकांचा तो लाडका कलाकार झाला.

कलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, 'भूषण प्रधान'. जिद्द आणि मेहनतीसह जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, ह्यामुळे अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असलेल्या ह्या उत्तम कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू

त्या जाहिरात प्रकरणी गोविंदा, जॅकी श्रॉफला २० हजारांचा दंड