पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आडनावात बदल ते बरंच काही..कतरिना कैफबद्दल रंजक गोष्टी

कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या मेक्सिकोमध्ये असून तिचा ३६ वा  वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. नुकतीच ती सलमानच्या 'भारत ' चित्रपटात झळकली. सध्या ती अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी' चित्रपटात  व्यग्र आहे.  कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात. 

-  कतरिनानं बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे स्वत:चं आडनावही बदलून घेतलं. ती आईचं आडनाव लावायची. तिचं आडनाव हे Turquotte होतं. जे उच्चारायला अवघड जायचं त्यामुळे 'बूम' चित्रपटाची निर्माती आयेशा श्रॉफ हिनं ते नाव बदलून कैफ असं केलं. यापूर्वी कतरिनासाठी काझी हे आडनाव ठरलं होतं. मात्र कतरिनानं नावात बदल करून कैफ हे नाव निवडलं. 
- कतरिनाच्या आई वडिलांचा ती लहान असताना घटस्फोट झाला. ती  नागरिकत्त्वानं ब्रिटीश असली तरी तिचा जन्म हा हाँगकाँगमध्ये झाला आहे. 
- कतरिनाच्या आईनं समाजसेवेत आपलं मन गुंतवलं. फिरत्या नोकरीमुळे कतरिना  चीन, फ्रान्स, स्विर्त्झलँड,  पोलंड, जपान, बेल्जिअम आणि अनेक युरोपीयन शहरात राहिली आहे. 

हेमा मालिनींना झाडू मारताना पाहून धर्मेंद्र यांची भन्नाट प्रतिक्रिया

- आईची नोकरी फिरतीवरची असल्यानं कतरिनाचं शिक्षण घरीच झालं आहे. 
- काही रिपोर्टनुसार कतरिनाचं इतर अभिनेत्रींप्रमाणे मुंबईत घर नाही ती भाड्याच्या घरात वांद्रे इथे राहत आहे. 
- कतरिनानं २००४ मध्ये एका तेलगू चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटासाठी तिला ७५ लाखांचं मानधन दिलं होतं. त्यावेळी दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत एका अभिनेत्रीला दिलेलं  हे सर्वाधिक मानधन होतं. 
- मेटल कंपनीनं कतरिनापासून प्रेरित होऊन बार्बी लाँच केली होती. बार्बी रुपात आलेली ही  पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री आहे. 
- महेश भट्ट यांच्या 'साया' चित्रपटासाठी कतरिनाची निवड करण्यात आली होती. मात्र  हिंदी येत नसल्यानं तिला चित्रपटातून वगळण्यात आलं.