पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्करच्या शर्यतीतून 'गली बॉय' बाहेर

गली बॉय

रणवीर सिंग - आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी 'गली बॉय'ची भारताकडून निवड करण्यात आली होती. मात्र द अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सनं नऊ विभागातील अंतिम चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीतील सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागातील अंतिम दहा चित्रपटात स्थान मिळवण्यासाठी 'गली बॉय'  अपयशी ठरला आहे. 

हृतिक रोशनच्या 'सुपर ३०' वर हॉलिवूडमध्ये चित्रपट?

जोया अख्तर यांनी दिग्दर्शित  'गली बॉय' चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तसंच, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. 'गली बॉय' चित्रपटाला या आधी मेलबर्न येथील भारतीय फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 

नेहरुंविषयी वादग्रस्त पोस्ट; पायल रोहतगीला ८ दिवसांची 'जेलवारी'