पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणवीर सिंगच्या 'गल्ली बॉय' चित्रपटाची ऑस्कर वारी

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या 'गली बॉय' चित्रपटाला भारताकडून ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीसाठी गली बॉय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. इंडियन फिल्म फेडरेशनने शनिवारी याची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

सुमीत राघवन यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले खडेबोल

जोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला गली बॉय चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तसंच, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. गली बॉय चित्रपटाला या आधी मेलबर्न येथील भारतीय फिल्म फेस्टिवल २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 

KBC ११: 'या' प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सोनाक्षी झाली ट्रोल

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या नावाची निवड प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. या रेसमध्ये गली बॉयसह 'उरी द सर्जिकल स्ट्राइक', 'केसरी', 'बधाई हो', 'आर्टिकल १५' आणि 'अंधाधून' हे चित्रपट होते. या सर्व चित्रपटांवर मात करत गली बॉय चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

करिनाने पतौडी हाऊसमध्ये कुटुंबियांसोबत 'असा' साजरा केला वाढदिवस