पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून गोविंदानं नाकारली 'अवतार' चित्रपटाची ऑफर

अवतार

'अवतार' हा चित्रपट हॉलिवूडमधला सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले. सर्जनशिलता, दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान यांचा योग्य ताळमेळ साधत तयार झालेला हा चित्रपट हॉलिवूडमधील दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा 'मास्टर पिस' म्हणूनही गणला जातो. गोविंदाला या चित्रपटातील एका भूमिकेसाठी जेम्स कॅमेरून यांनी ऑफर  दिली होती. मात्र गोविंदानं ही ऑफर नाकारली. 

'बिग बॉस'च्या घरात परतण्याबाबत शेफ परागचा खुलासा

'आप की अदालत' या कार्यक्रमात गोविंदानं हा खुलासा केला. इतकंच नाही तर 'अवतार' हे नाव मीच दिग्दर्शकांना सुचवलं असाही दावा गोविंदानं केला आहे. या चित्रपटासाठी मी ४१० दिवस चित्रीकरण करणं अपेक्षित होतं. कथेच्या गरजेनुसार संपूर्ण शरीरास बॉडी पेंटही लावण्यात येणार होता. मला बॉडी पेंट लावून इतके दिवस वावरणं मान्य नव्हतं. त्यामुळे मी अत्यंत नम्रपणे नकार कळवला. हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईन यासाठी मी कॅमेरून यांना शुभेच्छाही दिल्याचं गोविंदा या कार्यक्रमात म्हणाला.

प्रियांकाच्या वाढदिवसाच्या केकची किंमत ऐकून तुम्हालाही बसेन धक्का

गोविंदानं यापूर्वी 'गदर', 'चांदनी', 'ताल', 'देवदास' यांसारखे चित्रपटही नाकारले होते.  पेहलाज निहलानी यांच्या 'रंगीला राजा' चित्रपटात गोविंदा शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला.