पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अवतार' नाकारल्यानं झालेल्या ट्रोलिंगविषयी गोविंदा म्हणतो..

गोविंदा

 'अवतार' चित्रपटाची ऑफर मला आली होती. मी नम्रपणे ती संधी नाकारली मात्र चित्रपटासाठी नाव मीच सुचवलं, असा दावा अभिनेता गोविंदानं गेल्याचं आठवड्यात एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.  त्यानंतर पुढचे  काही दिवस गोविंदा हा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय ठरला.  या ट्रोलिंगविषयी गोविंदानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

सलमानच्या त्या वक्तव्यामुळे दीपिका नाराज

''गोविंदासारखा व्यक्ती जेम्स कॅमेरुनसारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा चित्रपट कसा नाकारू शकतो, असं प्रश्न अनेकांना पडला आहे, लोकांना हे वाटणं साहजिकच आहे. ते कोणत्या ठिकाणाहून आले आहेत, त्यांचे विचार मी समजू शकतो. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी याचा आदर करतो. मात्र काही लोकांच्या मनात हा पूर्वग्रह असतो, माझी लायकी नाही अशातला भाग नाही, मात्र लोकांच्या मनात असलेला पूर्वग्रह हे विचारायला भाग पाडतो. चहावाला पुढे कसा गेला? छोट्या पडद्यावरचे कलाकारांना रुपेरी पडद्यावर कशी संधी मिळाली? असे विचारणारे अनेकजण आहेत. 

दिया-साहिलला भेटलेच नाही, घटस्फोटासाठी जबाबदार धरलेल्या कनिकाचा खुलासा

तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा अन्यथा नका ठेवू पण चुकीच्या गोष्टी परसवू नका'', असं मत गोविंदानं बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.