उत्तर प्रदेशमधील मुझ्झफरनगर येथील ग्राहक न्यायालयानं वेदनाशामक तेलाची जाहिरात करणाऱ्या गोविंदा आणि जॅकी श्रॉफला २० हजारांचा दंड ठोठावला आहे. पाच वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयानं हा दंड ठोठावला आहे.
VIDEO: 'थलाइवी' चित्रपटाचा फस्ट लुक आणि टीझर प्रदर्शित
गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांनी केलेल्या जाहिरातीत हे हर्बल तेल पंधरा दिवसांत वेदनेपासून आराम देते, असा दावा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे १५ दिवसांत आराम न पडल्यास संपूर्ण पैसे ग्राहकाला परत करण्याचं आश्वासनही कंपनीनं दिलं होतं. २०१२ मध्ये अभिनव अग्रवाल नावाच्या वकिलानं आपल्या ७० वर्षीय वडिलांसाठी ३,६०० रुपये मोजून हे तेल खरेदी केलं होतं. मात्र अपेक्षित वेळेत परिणाम न साधल्यानं अभिनव यांनी कंपनीस संपर्क साधला. कंपनीच्या आश्वसानाप्रमाणे उत्पादनाचे संपूर्ण पैसे अभिनव यांस मिळणं अपेक्षित होतं मात्र कंपनीनं पैसे देण्यास नकार दिला, याउलट कंपनीमुळे खूपच मनस्ताप झाला असं अभिनव यांचं म्हणणं होतं. अभिनव यांनी ग्राहक न्यायालयात याप्रकरणाची तक्रार केली.
'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चित्रपटात दिसणार सनी लिओनी
या प्रकरणात न्यायलयानं कंपनी, गोविंदा, जॅकी श्रॉफ, मॅक्स कम्युनिकेशन, टेलिमार्ट शॉपिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांना २० हजारांची नुकसान भरपाई अभिनव यांना देण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे कंपनीस अभिनव यांचे ९ टक्के व्याजानं ३६०० रुपये परत करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.