पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोगॅम्बो खुश हुआ!, अमरिश पुरी यांना 'गुगल डुडल'कडून अभिवादन

अमरिश पुरी

आपल्या आवाज आणि अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत कायम नावाजले गेलेले दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. गुगल डुडलच्या माध्यमातून त्या दिवसातील एखादी मोठी घटना, व्यक्ती यांच्यावर भाष्य केले जाते. अमरिश पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डुडलमध्ये त्याचे रेखाचित्र विविध रंगी डिझाईनच्या पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आले आहे.

प्रभू श्रीराम हे मुसलमानांचेही पूर्वजः रामदेव बाबा

अमरिश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पंजाब राज्यातील जालंधऱमध्ये झाला होता. १९७१ मध्ये 'रेश्मा और शेरा' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतरही चित्रपट रसिकांमध्ये अमरिश पुरी यांच्याबद्दल प्रेम होते. मिस्टर इंडिया, शहेनशाह, करण-अर्जुन, कोयला, दिलजले, विश्वात्मा, राम-लखन, तहलका, गदर, नायक, दामिनी या व इतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेला खलनायक विशेष गाजला होता. अमरिश पुरी यांच्यामुळे त्यावेळी अनेक हिंदी चित्रपट सुपरहिट झाले होते.

१२ जानेवारी २००५ रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.