पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुड न्यूज : अशीही धमाल 'अदला बदली'

गूड न्यूज

अक्षय कुमार, करिना कपूर, किआरा अडवाणी, दिलजित दोसांज यांची प्रमुख भूमिका  असलेल्या 'गुड न्यूज' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन जोडप्यांची ही कथा आहे.  आयवीएफ चाचणीदरम्यान समान नावांमुळे डॉक्टरांचा घोळ होतो आणि या घोळातून निर्माण झालेल्या गोंधळाची गोष्ट 'गुड न्यूज' मध्ये आहे. 

माफिया जगाचा वेध घेणारा 'आयपीसी ३०७ ए'

गुड न्यूज या विनोदी चित्रपटानिमित्तानं अक्षय कुमार, करिना कपूर, किआरा अडवाणी, दिलजित दोसांज हे चारहीजण पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. या वर्षांतला सर्वात मोठा गोंधळ असं वर्णन करत चित्रपटाच्या टीमनं चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवली होती. 

याचित्रपटात या चौघांव्यतिरिक्त तिस्का चोप्रा, युक्ता मुखी, गुलशन ग्रोव्हरयांसारखे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. २७ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

सत श्री अकाल जी, लाल सिंह चड्ढा आलाय भेटीला