पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गूड न्यूज'! परदेशातही चित्रपटाची बक्कळ कमाई

गूड न्युज

अक्षय कुमार- करिना कपूर, दिलजित दोसांज- किआरा अडवाणीची प्रमुख भूमिका असलेला 'गूड न्यूज' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभताना दिसत आहे.  विशेष म्हणजे भारतातच नाही तर परदेशातही चित्रपटानं बक्कळ कमाई केली आहे. आता या चित्रपटाची २०० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरु झाली आहे. 

दीपिकाच्या इमारतीत रणवीरनं घेतला भाडेतत्वावर फ्लॅट ?

भारतीय बॉक्स ऑफिसवर 'गुड न्यूज'ची एकूण कमाई

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार 'गुड न्यूज'नं सहा दिवसांत एकूण १२७. ९० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी २७ कोटी, दुसऱ्या दिवशी २१.७८ कोटी, तिसऱ्या दिवशी २५.६५ कोटींची कमाई चित्रपटानं केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून नववर्षांच्या पहिल्याच दिवशी चित्रपटानं २२.५० कोटींची कमाई केली आहे. 

आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरील कमाई 
या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर एकूण ४५.८२ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, युएईमध्येही प्रदर्शित झाला आहे. 

अनुराधा पौडवाल यांच्यावर केरळच्या महिलेचा धक्कादायक आरोप

पुढील आठवड्यात दीपिका पादुकोनचा 'छपाक', अजय देवगनचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' आणि रजनिकांत यांचा 'दरबार' प्रदर्शित होत आहे. हे तिन्ही मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यानं नक्कीच 'गुड न्यूज'समोर मोठं आव्हान असणार आहे.