पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'गुड न्यूज' सुसाट; एका दिवसात एवढ्या कोटींची कमाई

गुड न्यूज चित्रपट

अक्षय कुमार- करिना कपूर, दिलजित दोसांज- किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला 'गूड न्यूज' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांसह चित्रपटाच्या विश्लेषकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.

ही वाढदिवसाची सर्वोत्तम भेट होती, सलमाननं मानले अर्पिताचे आभार

बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा 'दबंग ३' चित्रपट असताना देखील गुड न्यूजने चांगली कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटाने सलमान खानच्या 'दबंग ३' चित्रपटाला मागे सारत १८ कोटींची कमाई केली आहे. दबंग ३ चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर जवळच्या मित्राचा धक्कादाय खुलासा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' चित्रपटाने १७.५६ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. आठड्याच्या शेवटी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे चित्र आहे. 

बॉक्स ऑफिसवर कंगनासोबत 'पंगा', वरुण म्हणतो....