पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गूड न्यूज'साठी बॅड न्यूज!, कर्नाटक हायकोर्टात सिनेमा विरोधात याचिका

प्रदर्शित झालेला नवा हिंदी सिनेमा गूड न्यूज

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला गुड न्यूज सिनेमा प्रदर्शनानंतर लगेचच वादात सापडला आहे. या सिनेमाविरोधात आता कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दिल्ली गारठली; ११८ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक

बात्रा आडनाव असलेली दोन जोडपी एका खासगी रुग्णालयात संततीसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेण्यासाठी जातात, असे सिनेमामध्ये दाखविण्यात आले आहे. पण या रुग्णालयात या दोन्ही वेगवेगळ्या जोडप्यांतील पतीच्या शुक्राणूंची आदलाबदल होते. यामुळे पुढे जी काही गडबड होते, ते या सिनेमात बघायला मिळते. 

... म्हणून आंदोलकांना आता धडकी भरली, उत्तर प्रदेश CMO चे ट्विट्स

म्हैसूरस्थित एका स्वयंसेवी संस्थेकडून या सिनेमाच्या कथानकावरच आक्षेप घेण्यात आला आहे. या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष मीर समीम रजा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अशा पद्धतीचा सिनेमा बघून सामान्य जोडप्यांना आयव्हीएफमध्ये अशा पद्धतीची गडबड होऊ शकते, असे वाटेल. त्यामुळे त्यांचा या नव्या तंत्रज्ञानावरचा विश्वास कमी होईल. त्यामुळे आयव्हीएफ येत्या काळात अडचणीत येऊ शकते, असे त्यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:good newwz film controversy case filed against movie good newwz in karnataka court akshay kumar kareena kapoor