पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गूड न्यूजची बॉक्स ऑफिसवर कमाल, कमाईमध्ये वेगाने वाढ

गूड न्यूजमधील एक पोस्टर

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला गूड न्यूज सिनेमा गेल्या आठवड्यात शुक्रवारी प्रदर्शित झाला. वेगळी कथा असल्यामुळे प्रदर्शनापासून या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाचे समीक्षकांनीही कौतुक केले. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १७.५६ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी २१.७८ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी रविवारी २५.६५ कोटी रुपयांची कमाई सिनेमाने केली. त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटी रुपयांची कमाई केली.

शपथविधीनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली राहुल गांधींची भेट

बॉक्स ऑफिस इंडिया वेबसाईटवरील माहितीनुसार सोमवारी या सिनेमाने १३ कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने ७८ कोटी रुपये कमाविले आहेत. जर याच गतीने सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवणे सुरू ठेवले तर याच आठवड्यात हा सिनेमा ११५ कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफबद्दल हे पाच मुद्दे तुम्हाला माहितीये?

गूड न्यूज सिनेमाने आतापर्यंत दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळुरू आणि पुणे या शहरांमध्ये मोठा व्यवसाय केला. त्याचबरोबर जयपूर आणि नागपूर या शहरांमध्येही या सिनेमाने चांगला व्यवसाय केला. छोट्या शहरांमध्ये सिनेमाने फारसा व्यवसाय केलेला नाही, असेही दिसून आले आहे.