अक्षय कुमार- करिना कपूर, दिलजित दोसांज- किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला 'गूड न्यूज' चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं चौघंही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. तर अक्षय कुमार- करिना कपूरची जोडी बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी दिलजित ही पहिली पसंती नव्हती.
स्मृतिदिन विशेष : ..अचानक नियतीचे फासे उलटे पडले
दिलजितच्या भूमिकेसाठी सर्वांत आधी रॅपर, गायक बादशाहला विचारण्यात आलं होतं. आपल्या पंजाबी, हिंदी गाण्यानं बॉलिवूड आणि तरुणांना थिरकायला लावणारा बादशाह सध्या बॉलिवूड गायकांच्या फळीत आघाडीवर आहे. त्याला 'गूड न्यूज' मधील दिलजितची भूमिका आधी देण्यात आली होती. मात्र बादशाहानं या भूमिकेसाठी नकार दिला.
बादशाहानं नुकतीच कपिल शर्मा शो मध्ये उपस्थिती लावली होती, त्यावेळी बादशाहानं ही गोष्ट कबुल केली. यापूर्वी बादशाहला 'लस्ट स्टोरीज'मधील विकी कौशलच्या भूमिकेसाठी करण जोहरनं विचारलं होतं. मात्र तेव्हाही बादशाहानं नकार दिला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्याच्याविरुद्ध किआरा अडवणी प्रमुख भूमिकेत होती.
स्मृतिदिन विशेष : 'आनंदयात्री सर्वांना रुखरुख लावून कायमचा निघून गेला'
बादशाहानं 'गूड न्यूज' आणि 'लस्ट स्टोरीज' या दोन्ही चित्रपटांना नकार दिला, मात्र गायक म्हणून नाव कमावलेल्या बादशाहानं 'खानदानी शफाखाना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.