पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Confirmed : 'गो गोवा गॉन २' येतोय!

गो गोवा गॉन २

बहुप्रतिक्षित अशा 'गो गोवा गॉन' चा सीक्वल लवकरच येणार आहे, या बातमीला स्टुडिओ इरॉस इंटरनॅशनल आणि मॅडॉक फिल्मसकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.  सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दास आणि आनंद तिवारी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट हॉरर कॉमेडी प्रकारात मोडतो. २०१३ साली  आलेल्या या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. गेल्या वर्षभरापासून चित्रपटाचा सीक्वल येणार अशा चर्चा सुरु होत्या अखेर या चर्चांना अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. 

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेतील आलियाचा पहिला लूक प्रदर्शित

गोव्याला पिकनिकसाठी गेलेल्या तीन मित्रांवर एक भयंकर प्रसंग कोसळतो.  ड्रग्जसच्या आहारी गेलेले सर्वच एका चुकीच्या ड्रग्जमुळे झॉम्बी होतात.  या मोठ्या संकंटातून  बाहेर पडण्याची तीन मित्रांची धडपड सुरु होते, यात त्यांना साथ देतो सैफ अली खान. संकंटातून मार्ग काढताना अनेक मजेशीर घटना घडत जातात. भयपटाला मिळालेल्या विनोदाच्या तडक्यानं हा चित्रपट खूपच चालला. 

मकर संक्रांत : 'चला सकारात्मक व्हायरल पसरवूया'

विशेष म्हणजे हॉरर कॉमेडीचा प्रयोग बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरला. या चित्रपटाचा शेवट जिथे होतो तिथून नव्या कहाणीला सुरुवात होणार असल्याचं समजत आहे. मार्च २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.