पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'टाईमपास'मधली ही अभिनेत्री 'गर्ल्स'मध्ये मुख्य भूमिकेत

गर्ल्स

गेल्या काही दिवसांपासून आगमी मराठी चित्रपट 'गर्ल्स'चे बोल्ड पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कोण याचं कुतूहल सर्वांना होता. दोन महत्त्वाच्या अभिनेत्रींच्या नावावरून पडदा उठल्यानंतर आता तिसऱ्या अभिनेत्रीचंही नाव समोर आलं आहे. 

'गर्ल्स' मधल्या पहिल्या अभिनेत्रीचं नाव समोर

'टाईमपास'मधली अभिनेत्री अन्विता फलटणकर ही 'गर्ल्स'मध्ये मुख्य भूमिकेत आहे. ती रुमी ही व्यक्तीरेखा साकारत आहे. 'रुमी'चा शोध खरंतर पटकन लागला. 'रुमी' कशी सापडली, याबद्दल विशाल देवरुखकर सांगतात, '' रुमीच्या भूमिकेसाठी आम्ही गोबरे गाल असणाऱ्या हेल्दी मुलीच्या शोधात होतो. परंतु ऑडिशन घेऊनही मनासारखी 'रुमी' सापडत नव्हती. तेव्हाच मला अन्विता आठवली. अन्विताचे 'टाईमपास'मधील काम मी पहिले होते. त्यामुळे मी तिला ऑडिशनला बोलवले आणि पहिल्याच फटक्यात 'रुमी'च्या भूमिकेसाठी आम्ही अन्विताची निवड केली. मी असे म्हणेन की बाकीच्या दोन 'गर्ल्स'पेक्षा 'रुमी' आम्हाला सहज सापडली. माझ्या डोक्यात 'रुमी'ची जशी प्रतिमा होती तशीच अन्विता आहे. मुख्य म्हणजे 'रुमी'आणि अन्वितामध्ये खूप साम्य आहे. त्यामुळे अन्वितालाही 'रुमी' साकारणे सोपे गेले.''  

अन्विता फलटणकर

माझ्या नवऱ्याची बायको : ४० वर्षांनी कमबॅक केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. दरम्यान या चित्रपटातील बोल्ड पोस्टरवर अनेकांच्या नाराजीच्या प्रतिक्रिया पहायला  मिळाल्या.