पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंकज उधास पहिल्यांदाच मराठीत गाणार भावगीत

पंकज उधास

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास हे आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मराठीत भावगीत गाणार आहे.  कविता पौडवाल यांच्यासोबत ते 'रंग धनुचा झुला' हे गाणं गाणार आहे. या गाण्याद्वारे ते पहिल्यांदाच मराठी संगीत विश्वात पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे पंकज यांचे मराठी रसिक श्रोते खूपच उत्सुक आहेत. 

आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार नागार्जुनही

 ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की या गाण्याला संगीत देणार आहेत तर मंदा चोळकर यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. ' माझ्या तीस वर्षांच्या कार्यकाळात मी पहिल्यांदाच मराठीत गाणं गाणार आहे. मी मुंबईत इतकी वर्षे राहिलो आहे मात्र मराठीतून गाण्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला.  अशोक पत्की आणि कविता पौडवाल यांच्यासोबत काम करताना आनंद होत आहे. हे गीत मराठी श्रोत्यांच्या हृदयाला भावेल' असं पंकज उधास म्हणाले. 

अभिनेता अर्जुन रामपाल - मेहर जेसिया यांचा घटस्फोट

कविता पौडवाल या प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या कन्या आहेत. पंकज उधास यांनी ८० आणि ९० च्या दशकातील चित्रपटात अनेक गझल गायल्या आहेत.