पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूड कलाकार परदेशात तर सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी हॉलिवूड कलाकार भारतात

 सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी हॉलिवूड कलाकार भारतात

ख्रिस्मसच्या सुट्ट्या आणि नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांची परदेशातील पर्यटन स्थळांना पसंती पहायला मिळाली. अनेक कलाकार सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारताबाहेर गेले होते, त्याउलट काही हॉलिवूड कलाकारांनी  सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारताला निवडलं. 

२०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या बॉलिवूड चित्रपटांची यादी

'गेम ऑफ थ्रोन्स' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री  एमिलिया क्लार्क ही नववर्ष साजरं करण्यासाठी भारतात आली होती. ती आईसोबत जयपूरला आली होती. नववर्ष साजरं केल्यानंतर एमिलिया जयपूरहून दिल्लीला गेली. गेम ऑफ थ्रोन्समधील 'डेनेरेस तारगारयेन'  उर्फ मदर ऑफ ड्रॅगन ही लोकप्रिय भूमिका एमिलियानं साकारली होती. 

तर जेरार्ड बटलर हा हॉलिवूड अभिनेताही सुट्टी व्यतीत करण्यासाठी भारतात आला होता. ऋशिकेषमध्ये नदीच्या किनारी  जेरार्डनं सुट्ट्यांचा आनंद लुटला. गंगेच्या किनारी सुट्ट्या व्यतीत करण्याचा आनंद हा अविस्मरणीय होता अशा शब्दात जेरार्डनं आपला अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केला. यापूर्वी त्यानं कर्नाटकला भेट दिली होती. 

Happy Birthday: ५० वर्षांपासून प्रयोगाची परंपरा कायम राखणारा नाटककार