पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मृण्मयीची बहीण नव्या मालिकेत, शेअर केला पहिलावहिला अनुभव

गौतमी देशपांडे

मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी देशपांडेदेखील बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात  आली आहे. झी मराठीवरील नवीन मालिका 'माझा होशील ना' मधून  ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

एका अनोख्या कुटुंबाची आणि हळुवार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.  या मालिकेत  गौतमी सई ही भूमिका साकारत आहे.  विशेष म्हणजे या मालिकेत मराठीतील अनेक दिग्गज ज्येष्ठ कलाकारांची फौज आहे  त्यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव गौतमीनं शेअर केला आहे. 

स्वप्नील जोशीचं वेबच्या दुनियेत पदार्पण

दिग्गज कलाकारांसोबत काम करताना तुम्ही नवीन गोष्टी शिकत जाता. दिग्गज कलाकार समोर असल्यावर चांगलं काम करण्याचं दडपण असतं पण गेली अनेक वर्षे हे कलाकार इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून खूपचं शिकायला मिळतं, असं गौतमीनं सांगितलं. 
या मालिकेत टीपिकल  सासू- सूनेची भांडणं नाही, मात्र सासऱ्यांची फौज आहे. मालिकेत सारेच पुरुष कलाकार आहे तेव्हा हा नवा अनुभवही गौतमीनं सांगितला. मला तर खूपच मजा येतेय. माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे कारण याआधी मी कधीच इतक्या कलाकारांमध्ये काम केलं नव्हतं. या मालिकेत सासू सुनेचं भांडण नाही आहे. या मालिकेत एक दोन नाही तर पाच सासऱ्यांची फौज आहे आणि त्यांच्या घरात जेव्हा सून म्हणून एक स्त्री येते तेव्हा काय घडत हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल, इतके सगळे अभिनेते असल्यावर एक अभिनेत्री म्हणून त्यांची एनर्जी मॅच करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असं गौतमी म्हणाली.

कोरोनामुळे मराठी कलाकारांचं होळी सेलिब्रेशन रद्द