पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सव २०१९ : घरीच बाप्पांची मुर्ती तयार करणार मराठी कलाकार

राकेश बापट

पुढील आठवड्यात लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. मुंबईतल्या बाजारपेठा गणोशोत्सवासाठी सजल्या आहेत. अनेक मोठमोठ्या मंडळांच्या बाप्पाचे आगमन झाले आहेत. तर घरघुती गणेशाची तयारी जोरदार सुरू आहे. अनेक मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचे आगमन होते. मराठी कलाकारांचा भर हा नेहमीच इको फ्रेंडली गणेशोत्सवास असतो. हिंदी आणि मराठीतील लोकप्रिय अभिनेता राकेश बापटही सध्या गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक आहे.

मुंबईतल्या गणेशोत्सवासही मंदीची झळ, प्रायोजकांच्या संख्येत घट
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A being so pure even his silhouette is endearing #ganpatibappamorya 🙏

A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on

फत्तेशिकस्त : १५ नोव्हेंबरला रक्ताची रंगपंचमी

राकेशच्या घरातील गणोशोत्सवाची विशेष बाब म्हणजे तो स्वत: बाप्पांची मुर्ती तयार करतो. गेल्या कित्येक वर्षांपासून राकेश घरीच मातीपासून  गणरायाची मुर्ती तयार करतो. राकेश हा हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. चित्रीकरणातून वेळ काढून तो घरच्या घरी गणेशाची मुर्ती घडवतो. गणेश चतुर्थीच्या आधीचा काळ तो बाप्पाची मुर्ती घडवण्यात व्यग्र  असतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This!!!... Is bliss!!! 💫 #soultherapy #blessings #comingalive #ganpatibappamorya 🙏

A post shared by RaQeshBapat (@raqeshbapat) on

राकेशनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  मुर्ती घडवतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यानं घरीच घडवलेली गणरायाची सुबक मुर्ती पाहून चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. राकेश हा अभिनेता आहे मात्र तो उत्तम चित्रकार आणि शिल्पकार आहे याची प्रचिती त्याच्या चाहत्यांना यानिमित्तानं आली.