पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणरायाच्या आगमनासाठी 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम

बाप्पा मोरया

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने  होते. लाडक्या गणरायाच्या आगमनाला मोजून चार दिवस उरले आहेत. हाच दुग्धशर्करा योग साधत, गायक अमित चारी गणेशोत्सवाचे वातावरण अधिक प्रसन्न, भक्तिमय करण्यासाठी घेऊन येत आहेत, 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम. 

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी असे मिळलीत टोलमाफीचे स्टिकर्स

पेशाने व्यावसायिक असलेले अमित चारी आपली संगीत क्षेत्रातील वाटचाल बाप्पाच्या आशीर्वादाने करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच गणपती स्पेशल 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम प्रदर्शित झाला आहे. आजच्या काळात तरुणाईला प्रादेशिक भाषांची भुरळ असतानाच अमित यांनी मात्र कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले. 

मुंबईतल्या गणेशोत्सवासही मंदीची झळ, प्रायोजकांच्या संख्येत घट

मी गायक नाही, संगीत ही माझी आवड आहे. आवड असेल तर सवड ही मिळतेच, त्यानुसार माझी गायनाची आवड मी जपत आहे असं ते म्हणले. आजवर बॉलिवूड, पंजाबी गाण्यांमध्ये असलेली भव्यता 'बाप्पा मोरया' मध्ये दाखवण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा यात पुरेपूर वापर करण्यात आला असून भव्य सेट दाखवण्यात आला आहे. खास गणपतीसाठी तयार करण्यात आलेला हा अल्बम प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा अमितनं व्यक्त केली आहे.