पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून अमितचा यंदाचा गणेशोत्सव दणक्यात!

अमित चारी

गणेशोत्सवाची प्रत्येकाची तयारी वेगळी असते. गायक अमित चारी हा त्यातीलच एक हटके कलाकार आहे. आपल्या घरी दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन होण्यापूर्वी तो महिनाभर अगोदर चक्क उपवास करतो. कामातून वेळ मिळत नसला तरी चार दिवस वेळात वेळ काढून त्याने गणपतीच्या आगमनाची तयारी केली आहे. 

मी धार्मिक नाही,पण बाप्पाशी माझं वेगळंच नातं: भूषण प्रधान

घरच्या गणेशोत्सवाबद्दल अमित सांगतो की, आमच्याकडे वर्षानुवर्षें शाडूची मूर्ती आणली जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आमचा विशेष कल असतो. या दीड दिवसांत आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आपली काम बाजूला ठेवून, बाप्पाच्या सेवेत तत्पर असतात. अनेक जण दर्शनासाठी येतात त्यामुळे एकंदरच प्रसन्न वातावरण असते. 

गणरायाच्या आगमनासाठी 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम

बाप्पा घरात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. प्रसादाची, गोडधोड पदार्थांची अगदी रेलचेल असते. ज्या बाप्पाची आपण इतक्या आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतो, त्याचे विसर्जन होताना मात्र मन खिन्न होते. यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी विशेष आहे. व्यवसायात यश मिळाल्यानंतर आता माझा 'बाप्पा मोरया' हा पहिला मराठी अल्बमही नुकताच प्रदर्शित झाला आहे. बाप्पाच्याच आशीर्वादाने त्याला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जरा दणक्यातच साजरा होणार आहे.