पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरोज खानविरोधात गणेश आचार्य मानहानीचा दावा ठोकणार

सरोज खानविरोधात गणेश आचार्य मानहानीचा दावा ठोकणार

बॉलिवूडचा नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शका सरोज खानविरोधात मानहानीचा दावा ठोकणार  आहे. सरोज खान माझ्याविरोधात कट रचत आहेत त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात भ्रष्टाचारास त्या खतपाणी घालत असा आरोप गणेश आचार्य यांनं केला आहे. ३३ वर्षीय महिलेनं गणेश आचार्य विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर गणेश आचार्य यानं थेट सरोज खानवर निशाणा साधला आहे. 

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी माझ्याविरोधात हा रचण्यात आलेला कट आहे. सरोज खानसारखे लोक या  क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. आता त्यांचा व्यावसाय डबघबाईला आला आहे कारण मी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोशिएशनच्या पदावर आहे, असं गणेश आचार्य म्हणाला. 

सलमानवर गोव्यात बंदी घालण्याची काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची मागणी

 मी लवकरच सरोज खान विरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहे. कारण त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यासारखे लोक घरी बसून बेकायदेशीररित्या पैसे कमवत आहेत, मी याच्याविरोधात लढा देत आहे त्यामुळे ते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोपही आचार्यनं केला आहे. 

मंगळवारी ३३ वर्षीय महिलेनं गणेश आचर्यवर गंभीर आरोप केले होते. यात प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची  बळजबरी केल्याचा तसेच कामापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. या महिलेनं गणेश आचार्यविरोधात अंबोली पोलिस ठाणे तसेच महिला आयोगाकडे तक्रारही केली होती. 

चित्रीकरणासाठी Man Vs Wild च्या टीमनं भरले इतके शुल्क