पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : चित्रीकरण बंद, मनोरंजन विश्वात रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी चित्रपट संघटनांचा पुढाकार

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणूचा  देशातील वाढता प्रादुर्भाव पाहता चित्रपट संघटनांनी १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरात असे कुठलेही चित्रीकरण करता येणार नाही.  चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्वाधिक फटका हा मालिकांना बसणार आहे. कोरोनामुळे भारतीय मनोरंजन विश्वाला जवळपास ८०० कोटींचा फटका  बसला आहे. मनोरंजन विश्वात कलाकार तंत्रज्ञ यांच्याबरोबरच रोजंदारीवर काम करणारे हजारो लोक आहेत. त्यांना दरदिवशीच्या कामाचे पैसे दिले जातात. मात्र आता चित्रीकरणच बंद असल्यानं दोन आठवडे या रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कोरोना : ... तर इंग्लंडमध्ये पाच लाख आणि अमेरिकेत २२ लाख मृत्युमुखी

म्हणूनच फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडिया सिने एम्प्लॉईनं (FWICE) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  या संघटनेशी निगडीत सदस्यांना धान्य आणि  दैंनदिन जीवनातील आवश्यक गोष्टी  आठवड्याभरासाठी पुरवण्यात येणार आहे. २२ मार्चपासून सदस्यांना ही मदत केली जाणार आहे. FWICE नं निर्माते, चित्रपट आणि मालिकांशी निगडीत अनेक कलाकारांना पुढे येऊन या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 

कोरोना विषाणू प्लॅस्टिक, स्टीलवर २ ते ३ दिवस सक्रिय राहतात, नवे संशोधन

त्याचप्रमाणे प्रोड्यूसर गिल्डनंही मनोरंजन विश्वात रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी  निधी उभारण्याचं ठरवलं आहे. कोरोनामुळे खबरदारी म्हणून चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. मात्र  यामुळे दर आठवड्याला मनोरंजन विश्वाचं ८० ते  ९० कोटींचं नुकसान होत असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

कोरोनामुळे कलाकारांचं 'वेडिंग प्लानिंग' फिस्कटलं

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: FWICE to distribute ration and basic material of daily needs to needy members of its affiliates Coronavirus