पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तर दिलजित दोसांजचा व्हिसा रद्द करा, FWICE ची परराष्ट्र खात्याकडे मागणी

दिलजित दोसांज

पाकिस्तानी नागरिकानं अमेरिकेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा इशारा 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लोइज'नं (FWICE) गायक अभिनेता दिलजित दोसांजला दिला आहे.  पाकिस्तानी नागरिकत्त्व असलेल्या  रेहान सिद्दीकीनं अमेरिकेत कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात दिलजित दोसांजही सहभागी होणार आहे.

अदितीनं गमावले परदेशी चित्रपट कारण ऐकून तिही झाली अवाक्

मात्र FWICE नं यावर आक्षेप घेतला आहे. देशाच्या मान, अभिमानाचा विचार करावा, असाही टोला संस्थेनं लगावला आहे. दिलजितनं कार्यक्रमात  सहभागी होऊ नये असा इशारा त्याला दिला आहे.  त्याचप्रमाणे दिलजितनं कार्यक्रमाला जाणं रद्द केलं नाही तर त्याचा व्हिसा रद्द करावा अशी मागणी करणारं  पत्रही FWICE नं परराष्ट्र खात्याला लिहिलं आहे. 

Video : नऊ कलाकार, सहा लोककलाप्रकारांचा 'शिवराज्याभिषेक गीता'त सुरेल संगम

'कडक इशारा देऊनही अनेक कलाकार पाकिस्तानात जाऊन कार्यक्रम करत आहेत. श्रेया घोषाल, सैफ अली खानही पाकिस्तानी नागरिक रेहान सिद्दीकीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे असंही आम्हाला खात्रीलायक सुत्रांकडून समजलं आहे. दोन्ही देशांत तणाव सुरू  आहे त्यामुळे कलाकारांनी यात सहभागी होऊ नये देशाभिमान जपावा, असंही FWICE नं  आपल्या पत्रकात म्हटलं आहे.