पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयच्या 'पृथ्वीराज'मधून मिस वर्ल्ड मानुषी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

अक्षयच्या 'पृथ्वीराज'मध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर ही लवकरच अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  २०१७ साली मानुषीनं 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला होता. २०१७ पासून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा आहेत. अखेर 'पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून अक्षय पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे. 

'तान्हाजी'मध्ये हा मराठी अभिनेता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

या चित्रपटात मानुषी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संयोगिताच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरु होत्या. आम्हाला नवा चेहरा हवा होता, जो संयोगिता यांची भूमिका सुरेखपणे साकारेल. अखेर आम्हाला मानुषीच्या रुपानं संयोगिता मिळाली, अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिली. 

अफवांवर विश्वास ठेवू नका; लता मंगेशकरांच्या कुटुंबियांचे आवाहन

गेल्या काही  महिन्यांपासून मानुषी अभिनयाचे धडे घेत आहेत. या भूमिकेसाठी मानुषीही उत्सुक आहे.  

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिक-किआरासोबत दिसणार अभिनेत्री तब्बू