पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आई असल्यामुळे 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं

मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं

'मिस युक्रेन २०१८' चा किताब जिंकलेल्या २४ वर्षीय सौंदर्यवतीला आई असल्यानं मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं त्यामुळे तिनं या अन्यायाविरोधात कायदेशीर पद्धतीनं लढा देण्याचं ठरवलं आहे. मी एका मुलाची आई असल्यानं मला स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखणं चुकीचं आहे, या स्पर्धेच्या नियमात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत माझा  लढा कायम  राहिलं असं वेरोनिका म्हणाली.

वेरोनिका २०१८ मध्ये मिस युक्रेनचा किताब जिंकली. मात्र तिला ५ वर्षांचा मुलगा असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तिचा किताब आयोजकांनी काढून घेतला तसेच मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यापासून तिला बाद करण्यात आलं. 

क्रिती म्हणते, पती, पत्नी आणि वोसोबत पनिपत पाहा

माझं लग्न झालं आहे, तसेच एक मुलगा असल्यानं  मला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या नियमानुसार विवाहित महिला आणि आई या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. या स्पर्धेच्या आयोजकांनी त्यांची मागसलेली मानसिकता बदलायला हवी. मला किताब नको, मात्र या स्पर्धेचे नियम हे बदलायला हवे, असं वरोनिका म्हणाली.

यासाठी तिनं कायदेशीर लढाई लढण्याचं ठरवलं आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजकांनी त्यांच्या समानतेच्या कायद्याचा भंग केल्याचा तिचा आरोप आहे. वेरोनिकाकडून किताब काढून घेण्यात आला असल्यानं ती या स्पर्धेत युक्रेनचं प्रतिनिधित्त्व करणार नाही. 

आमिरचा 'दंगल' ठरला या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट - Yahoo India