पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mann Bairagi poster : पंतप्रधान मोदींवरच्या चित्रपटाची खास झलक

मन बैरागी

पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या ६९ व्या वाढदिवशी त्यांच्यावर आधारित चित्रपटाचा  पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला. बाहुबली फेम दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या हस्ते 'मन बैरागी' चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. 

बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या. संजय लीला भन्साळी आणि मनवीर जैन दोघांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधिरत हा खास चित्रपट आहे. मोदींच्या आयुष्याला  कलाटणी देणारा आणि आतापर्यंत क्वचितच ऐकलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारलेला असल्याचं समजत आहे. 

अभिनेत्री शिल्पाच्या तथ्यहिन आरोपांकडे लक्ष द्यायला वेळ नाही- सिंटा

या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतली आहे. यापूर्वी  ही गोष्ट कधीही ऐकली नसेन असं भन्साळी हिंदुस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात म्हणाले. या चित्रपटाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे आणि दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.

KBC ११ : महिन्याला दीड हजार कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता कोट्यधीश

यापूर्वी विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला मोदींचा  जीवनपट 'पीएम नरेंद्र मोदी' या नावानं प्रदर्शित झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मोदींचा जीवनपट सांगणारी वेबसीरिजही प्रदर्शित झाली होती.