पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या खेपेला आपला दु:खद अंत होणार नाही, दीपिकाच्या पोस्टवर रणवीरची मजेशीर प्रतिक्रिया

रणवीर दीपिका

‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा दीप-वीरची  बहुचर्चित जोडी चौथ्या चित्रपटात एकत्र काम करण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तरी आपला दु:खद अंत होणार नाही अशी गमतीशीर प्रतिक्रिया रणवीरनं दिली आहे. ‘रामलीला' चित्रपटाचा शेवट दोघांच्या मृत्यूनं होतो, ‘बाजीराव मस्तानी’ मध्येही हाच शेवट दाखवला आहे. ‘पद्मावत’मध्येही दीपिकाचा मृत्यू दाखवला आहे. या तिन्ही चित्रपटाचा शेवट हा  त्यातील कलाकारांचा अंतच आहे. 

आदित्य ठाकरेसोबतच्या मैत्रीविषयी दिशा म्हणते....
 

मात्र '83' चित्रपटाचा शेवट हा गोड होणार आहे या कल्पनेनंच रणवीर सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिका '83' चित्रपटात झळकणार अशा चर्चा होत्या. अखेर दीपिका आणि रणवीर या दोघांनी फोटो शेअर करत या चर्चांना अधिकृत दुजोरा दिला. दीपिकानं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर 'या खेपेला आपला  दु:खद अंत होणार नाही',  अशी प्रतिक्रिया रणवीरनं दिली आहे. त्या कॉमेंटला ४७ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.

Saaho teaser : प्रभास- श्रद्धाच्या अ‍ॅक्शन थ्रिलरचा टीझर पाहिलात का?

’83’ चित्रपटात दीपिका पादुकोन ही भारतीय  क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. दीपिका कपिल देव यांची पत्नी ‘रोमी देव’ यांची भूमिका साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच भारतीय संघाच्या  विजयी गाथेवर ’83’ हा चित्रपट आधारलेला आहे.