नव्या वर्षांची सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यापासून बॉलिवूडमध्ये सर्वांत मोठे चित्रपट प्रदर्शित व्हायला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या वर्षांत अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. चला तर पाहू बॉलिवूडमधले या वर्षांत प्रदर्शित होणारे काही महत्त्वाचे चित्रपट.
छपाक, तान्हाजी- द अनसंग वॉरियर
दीपिका पादुकोन जवळपास वर्षभरानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. २०१८ मध्ये 'पद्मावत' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. पुढील आठवड्यात तिचा 'छपाक' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. या दिवशी म्हणजे १० जानेवारीला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' चित्रपटही प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय देवगन तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे.
Happy Birthday: ५० वर्षांपासून प्रयोगाची परंपरा कायम राखणारा नाटककार
स्ट्रीट डान्सर ३ डी, पंगा
वरुण धवन, श्रद्धा कपूर, नोराह फतेही यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्ट्रीट डान्सर ३ डी' २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगनाचा 'पंगा' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.
लव आज कल सीक्वल
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 'लव आज कल'चा सीक्वल असणार आहे.
Video : रिंकूला हवाय 'हॉट राजकुमार'
शुभ मंगल ज्यादा सावधान, गुलाबो सिताबो, रुह अफ्जा
आयुष्मान खुराना आणि राजकुमार रावचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. तर एप्रिल महिन्यात अमिताभ बच्चन, आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका असलेला 'गुलाबो सिताबो' हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदाच आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत आहेत. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे याचवेळी जान्हवी कपूर, राजकुमार रावचा 'रुह अफ्जा'देखील प्रदर्शित होत आहे, त्यामुळे या चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार हे नक्की.
सूर्यवंशी
रोहित शेट्टी दिग्दर्शित अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच अक्षय कुमार रोहित शेट्टीसोबत काम करत आहे.
८३
भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर हा चित्रपट आधारित आहे. १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंग, दीपिका पादुकोन यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.
कुली नंबर १
सारा अली खान आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'कुली नंबर १' मे महिन्यात प्रदर्शित होणं अपेक्षित आहे. गोविंदाच्या 'कुली नंबर १'चा हा रिमेक आहे. वरुणचे वडील डेव्हिड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
आता सर्व मोफत वाहिन्यांसाठी महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये
पृथ्वीराज, लक्ष्मी बॉम्ब
अक्षय कुमारचे या वर्षांतले हे दोन महत्त्वपूर्ण चित्रपट आहेत. 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच अक्षयनं चाकोरीबाहेरची भूमिका निवडली आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. ईदला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर अक्षयचा 'पृथ्वीराज' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. अक्षय पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात काम करत आहे.
सडक २
'सडक २' च्या निमित्तानं आलिया भट्ट पहिल्यांदाच वडील महेश भट्ट यांच्यासोबत काम करत आहे. जुलै महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, पूजा भट्टही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
भूज द प्राइड ऑफ इंडिया
हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२० ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी आहे. या युद्धातील भारतीय वायूसेनाच्या शौर्याची कहाणी पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगन प्रमुख भूमिकेत असून तो स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांच्या भूमिकेत आहे.
It’s a privilege to present @ajaydevgn sir’s first look as Sq. Ld. Vijay Karnik from my upcoming directorial film #BhujThePrideOfIndia . #14Aug2020. pic.twitter.com/5pZiORdXjs
— Abhishekdudhaiya (@AbhishekDudhai6) January 1, 2020
लाल सिंग चड्ढा
आमिर खानचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असून हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा 'लाल सिंग चड्ढा' रिमेक आहे. या चित्रपटात करिना कपूर आमिरसोबत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असून ख्रिस्मसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.