पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'श्रीदेवी नाही तर मिस्टर इंडियाचा सीक्वलही नाही'

श्रीदेवी

बॉलिवूडमधला सीक्वलचा ट्रेंड पाहता आगामी काळात अनेक चित्रपटांचे सीक्वल येणार आहेत. यात चाहत्यांना खरी उत्सुकता होती ती मिस्टर इंडियाच्या सीक्वलची. मात्र आता श्रीदेवीच नाही तर मिस्टर इंडियाच्या सीक्वलबाबत प्रश्न विचारण्यात काय उपयोग?,  असा सवाल निर्माते दिग्दर्शक शेखर कपूर  यांनी  केला आहे. 

काही दिवसांपूर्वी अनिल कपूरनं शेखर कपूरसोबत फोटो शेअर केला होता. 'काहीतरी वेगळं आगामी काळात पहायला मिळणार आहे यासाठी मी खूपच उत्सुक आहे. जी जादू मिस्टर इंडियामध्ये पहायला मिळाली तितकंच वेगळं यंदाही पहायला मिळणार आहे', असं  ट्विट करत  अनिल कपूर यांनी फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर मिस्टर इंडियाच्या सीक्वलच्या चर्चेला उढाण आलं.

'बोनी कपूर  यांच्या डोक्यात सध्या काय विचार  सुरू आहे किंवा  या चित्रपटाचा सीक्वल येणार की नाही याबद्दल मला कल्पना  नाही. मात्र आता श्रीदेवीच  नाही त्यामुळे चित्रपटाच्या सीक्वलबद्दल प्रश्नच उद्भवत नाही. मी या चित्रपटाचा सीक्वल दिग्दर्शित करणार नाही',  असंही शेखर कपूर  यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. 

मिस्टर इंडिया हा श्रीदेवी यांच्या शिवाय अपूर्णच आहे. आता श्रीदेवी हयात नाही त्यामुळे या चित्रपटाची  पुन्हा निर्मिती करण्याचा प्रश्नच येत नाही. अनिल कपूर आणि शेखर कपूर गेल्या कित्येक वर्षांपासून या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत होते  मात्र आता  सीक्वल न करता एका वेब सीरिजसाठी एकत्र काम करण्याचं दोघांनी ठरवलं असल्याची माहिती सुत्राच्या हवाल्यानं संबधीत संकेतस्थळानं प्रसिद्ध केली आहे.