पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘झुंड’वादाच्या भोवऱ्यात, बच्चन यांना नोटीस तर नागराज मंजुळेंवर गंभीर आरोप

नागराज- बच्चन यांचा ‘झुंड’वादाच्या भोवऱ्यात

नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हैदराबादमधील चित्रपट निर्माते नंदी कुमार यांनी चित्रपटाचे निर्माते कृष्णनन कुमार, टी-सीरिजचे एमडी भूषण कुमार, दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि बच्चन यांना स्वामित्त्वहक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे त्या विजय बरसे यांना देखील नोटीस पाठवली आहे.

या नोटीसला फक्त टी-सीरीजने उत्तर दिल्याची माहिती नंदी यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेला दिली.  झोपडपट्टीमधील सॉकर  खेळाडू अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपट  काढण्याचे स्वामित्त्व हक्क २०१७ मध्ये आपण विकत घेतल्याचा दावा नंदी यांनी केला. तसेच ११ जून २०१८ रोजी  या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे नोंद केली असल्याचं त्यांचं  म्हणणं आहे. 

प्राजक्ता गायकवाड पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही रणरागिणी!

‘झुंड’चित्रपट ज्यांच्यावर आधारित आहेत ते विजय बरसे हे पॉलचे प्रशिक्षक आहे. अर्थात ‘झुंड’मध्ये पॉलचा  संघर्षही ओघानं आलाच, त्यामुळे हे  स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन असल्याचं नंदी यांचे म्हणणं आहे. त्यामुळे आता कुमार यांनी चित्रपटगृह, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. 

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रींना होती पहिली पसंती

 नंदी कुमार यांनी नागराज मंजुळेंवरही आरोप केले आहेत. नागराज यांनी अखिलेशकडून चार लाखांना हक्क विकत घेतल्याचा दावा केला मात्र मला  त्यासंदर्भातले दस्ताऐवज दाखवायला नकार दिला. अखिलेशचा हक्क विकण्याला विरोध होता. नागराज यांनी मला त्रास दिला तसेच पुरावे न दाखवता माझ्यावर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा दबाव टाकला असाही गंभीर आरोप त्यांनी केला.