पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुपरहिट 'स्त्री' चित्रपटाचा पार्ट २ आणि ३ येणार

स्त्री

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुरानाच्या 'स्त्री' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकूण १८० कोटींची कमाई केली होती.

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्याशी छेडछाड केल्याप्रकरणी कलर्स वाहिनीला नोटीस

 एका सत्य घटनेपासून प्रेरित असलेल्या या भयपटाला  विनोदाची किनार होती. भयपट आणि विनोदीपट यांची उत्तम सांगड घालून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. मात्र  'स्त्री' चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना संभ्रमात पाडणारा होता. कथेतील नेमकी 'स्त्री' म्हणजेच भूत कोण? हा प्रश्न अनुत्तरितच होता. 

लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेवर रानू म्हणतात..

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी या चित्रपटाचा सीक्वल येणार असं म्हणलं जात होतं. चित्रपटाचे निर्माते राज निधीमोरू आणि कृष्णा यांनी 'स्त्री' चित्रपटाचे आणखी दोन भाग येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा भाग येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे दुसरा हॉरर कॉमेडी चित्रपट 'गो गोवा गॉन'चाही सीक्वल येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.