पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फत्तेशिकस्त! स्वराज्याच्या शत्रूवर महाराजांचा सर्जिकल स्ट्राइक

फत्तेशिकस्त

मराठेशाहीचा इतिहास हा जसा संस्कृती, परंपरांचा, अभिमानाचा आहे तसाच तो शूरांचा, शौर्याचा आणि त्यांच्या बेधडक साहसाचा सुद्धा आहे. शत्रूंच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोहचला. युद्धनीती अन् रणनीती हीच खरी महाराजांची ओळख. अटकेपार झेंडा फडकवीत मराठ्यांनी हा इतिहास जिवंत ठेवला अन् प्रत्येकाच्या हृदयात रुजवला. हाच देदीप्यमान इतिहास आता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून दुमदुमणार आहे.

गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहितील सर्जिकल स्ट्राइकच! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’’ मधून अनुभवता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल वाहिनीची जाहीर माफी

अफझलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. शाहिस्तेखानाच्या  धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले. १ लाख मुघल सैन्याविरोधात आपले ९० विश्वासू शिलेदार घेवून महाराजांनी जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट लष्करी कारवाई फत्ते केली त्याचा रोमांचकारी अनुभव ‘फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नेटकऱ्यांचा संताप

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी  नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, सायली जोशी जाधव, अदिती भास्कर, सचिन गवळी, गणेश तिडके, राजेश अहेर, अक्षय शिंदे यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे. १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.