पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या 'फत्तेशिकस्त'ची एका आठवड्याची कमाई

फत्तेशिकस्त

स्वराज्याचा शत्रू असलेल्या शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहितील सर्जिकल स्ट्राइकच! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबईत ‘फत्तेशिकस्त’चे सारे शो हाऊसफुल्ल आहेत. या चित्रपटानं एका आठवड्यात साडेपाच कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर यांने 'फत्तेशिकस्त'च्या कमाईचा आकडा शेअर केला आहे. या चित्रपटानं  एका आठड्यात ५.६५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटानं ३.५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी चित्रपटानं ६५ लाख, दुसऱ्या दिवशी १.१७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १.६८ कोटींचा गल्ला जमवला होता. 

राम मंदीर- बाबरी मशिद प्रकरणावर कंगना करणार चित्रपटाची निर्मिती

अफझलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. शाहिस्तेखानाच्या  धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले. १ लाख मुघल सैन्याविरोधात आपले ९० विश्वासू शिलेदार घेवून महाराजांनी जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट लष्करी कारवाई फत्ते केली त्याचा रोमांचकारी अनुभव ‘फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळतो. 

त्या जाहिरात प्रकरणी गोविंदा, जॅकी श्रॉफला २० हजारांचा दंड

या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं.  मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी  नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, सायली जोशी जाधव, अदिती भास्कर, सचिन गवळी, गणेश तिडके, राजेश अहेर, अक्षय शिंदे यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.

इंडियन आयडॉलमधून अनु मलिकचे बाहेर पडणे हा माझा विजय: सोना महोपात्रा