पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Father's Day 2019 : बाप-लेकींच्या या जोड्या बॉलिवूडमध्ये आहेत प्रसिद्ध

फादर्स डे

वडील किंवा आईच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आलेत. यातल्या अनेक  स्टार किड्सनं आपल्या वडिलांइतंकच यश या क्षेत्रात कमावलं. आज फादर्स डे आहे. या फादर्स डे निमित्तानं वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रात आलेल्या अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेऊयात. 

सैफ अली खान- सारा अली खान 
सैफ अली खान गेल्या दोन दशकाहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आहे. त्याचे अनेक चित्रपट खूपच गाजले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत सारा अली खाननं २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विशेष म्हणजे  साराचा बोलका, हसरा स्वभाव सर्वांनाच आवडला. 

चंकी पांडे - अनन्या पांडे
चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिनं 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चंकी पांडे अनेक विनोदी  आणि खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s all about loving ur family (and urself lol) ❤️🤪 #HappyBirthdayRysu

A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

बोनी कपूर- जान्हवी कपूर 
आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांचा आदर्श ठेवत जान्हवी कपूरनंही गेल्याचवर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'धडक' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lurrvv u most #hbd 🐨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

महेश भट्ट- आलिया भट्ट
निर्माते दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलियानं स्वत:ची वेगळी ओळख या क्षेत्रात निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये कमी वय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. आलियानं अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.  'सडक'च्या सीक्वलमधून ती पहिल्यांदाच  आपल्या वडिलांसोबत काम करणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love you daddy-friend 💕 Happy Father’s Day 👨‍👧

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

शक्ती कपूर - श्रद्धा कपूर 
खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धानं बॉलिवूडमध्ये 'आशिकी २' या चित्रपटातून एण्ट्री घेतली. श्रद्धावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Time to step out, get going, baby steps, here we go! @shaktikapoor ♥️

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

अनिल कपूर- सोनम कपूर
बॉलिवूडमधले  एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूर ओळखले जातात. सोनमनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'सावरियाँ' हा तिचा पहिला चित्रपट होय. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या  'एक लडकी को देखा...' या चित्रपटातून या बाप लेकीच्या जोडीला एकत्र पाहण्याचा योग आला. 

शत्रूघ्न सिन्हा-  सोनाक्षी सिन्हा 
बॉलिवूडमधल्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शत्रूघ्न सिन्हाची  सोनाक्षी मुलगी. 'दबंग' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Whatever i am today is because my father believed in me as he did in my brothers. Whatever i am today is because i was given an education that would help me stand on my own two feet. Lets get together and do that for girls who have the will but not the way to be educated. Join @nanhikali in this endeavor, where #proudfathersfordaughters can register, get their portraits shot on the 5th and 6th of August at Mehboob Studios floor no 2, by some of the top photographers in the country like @colstonjulian, @prasdnaik, @atulkasbekar and more and help contribute towards the education of an underprivileged girl child! What are you waiting for 😊 #projectnanhikali #nanhikali

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

रणधीर कपूर- करिश्मा- करिना 
वडील रणधीर कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत करिश्मा कपूर आणि करिना कपूर  यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. करिना सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती लवकरच अंग्रेजी मीडियम, गूड न्यूज या चित्रपटात दिसणार आहे.