पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कंगनाची बहीण द्वेष पसरवते, ट्विटर बंद केल्याचं डिझायनरकडून समर्थन

रंगोली चंडेल

अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली चंडेल हिचं ट्विटर अकाऊंट हे ब्लॉक करण्यात आलं आहे. रंगोली ही समाजात विष पसरवत आहे, अशी टीका फॅशन ज्वेलरी डिझायनर फराह खान अली हिनं केली आहे. 'तिला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र लोकांवर वारंवार टीका करण्याचा अधिकार तिला नाही, तिच्याबद्दल मी तक्रार केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट हे बंद करण्यात आलं आहे, ती मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत आहे, पण का हेच मला कळत नाही', अशी प्रतिक्रिया फराहने द टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे. 

कोरोनाची अफवा पसरवल्याप्रकरणी भाजप खासदारावर गुन्हा

तिचं अकाऊंट बंद केल्याबद्दल मी ट्विटर इंडियाचे आभार मानते, असंही फराह म्हणाली. रंगोली ही ट्विटरवर एका विशिष्ट समुदयाला आपल्या ट्विटमधून टार्गेट करते म्हणून तिची तक्रार मी केली होती असंही फराह म्हणाली. काही दिवसांपूर्वी रंगोलीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोल्ड या चित्रपटाच्या दिग्दर्शिकेनं देखील केली होती. रंगोलीनं फेक न्यूज पसरवली आहे असा आरोप तिनं केला होता. 

चीनकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सुधारणा, मृतांची संख्या वाढली

 तर दुसरीकडे ट्विटर हे पूर्वग्रही असल्याचा आरोप रंगोलीनं केला आहे. ट्विटर अकाऊंट बंद केल्यानंतर मी माझं अकाऊंट पुन्हा सुरु करणार नाही असं रंगोलीनं म्हटलं आहे. मी माझी बहीण अभिनेत्री कंगना राणौत हिची प्रवक्ता आहे, आणि तिच्या मुलाखतींची जबाबदारी ही माझी आहे. ती मोठी अभिनेत्री आहे, अशाप्रकारेचे पूर्वग्रह असलेल्या माध्यमांना वगळून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्याजवळ अन्य पर्यायही आहेत असं रंगोलीनं म्हटलं आहे.