पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काजोलकडे चाहत्यानं मागितला फोन नंबर आणि....

काजोल

अभिनेत्री काजोल हिनं आपल्या लाखो चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर संवाद साधला. या संवादात काजोलनं आपल्या चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्याची मुभा दिली होती.  अनेक चाहत्यांनी  संधी न दवडता काजोलला प्रश्न विचारले. विशेष म्हणजे एका चाहत्यानं तिच्याजवळ चक्क तिचा फोन नंबरही मागितला. या चाहत्याला काजोलनंही भन्नाट उत्तर दिलं.

हॉलिवूडमध्ये संधी कशी मिळाली, प्रियांकानं सांगितले त्या दिवसाचे अनुभव

तिनं चक्क आपला नंबर १०० असल्याचं चाहत्याला सांगितलं. १०० हा पोलिसांचा क्रमांक आहे.  इतकंच नाही तर कधीही फोन कर असा उपरोधिक टोलाही काजोलनं लगावला. काजोलच्या विनोदाच्या अचूक टायमिंगची सौशल मीडियावर एकच चर्चा आहे. 

पुण्यात स्टंट चित्रीत करताना मोठ्या अपघातातून बचावला वरुण धवन

गेल्या वर्षी अजय देवगननं काजोलचा मोबाइल क्रमांक सोशल मीडियावर शेअर केला होता. हा मोबाइल क्रमांक अपघातानं शेअर झाला असं अनेकांना वाटत होतं, नंतर मात्र अजय देवगननं काजोलसोबत मस्करी करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

काजोल

काजोल आणि अजय देवगन हे  दोघंही 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात काजोल तान्हाजी मालुसरेच्या पत्नी  सावित्रीबाईंची भूमिका  काजोल साकारत आहे.

भूल भुलैया २ : जानेवारी महिन्यात पुढील चित्रीकरणाला होणार सुरुवात