पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पद्मश्रीवरून टीका करणाऱ्यांना अदनान सामीने दिले असे उत्तर

अदनान सामी

पद्मश्री पुरस्कारावरून पाकिस्तानी वंशाचे गायक अदनान सामी याच्यावर टीका सुरू असतानाच त्याने आपल्या टीकाकारांना उत्तर दिले. सोमवारी सकाळी एक ट्विट करून अदनान सामीने आपल्या टीकाकारांना उत्तर दिले. या उत्तरामध्ये त्याने टीकाकारांना वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत.

पाणीपट्टीत १२ टक्के वाढीचा प्रस्ताव, पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

आपल्या ट्विटमध्ये अदनान सामीने लिहिले आहे की, मुलांनो, तुम्ही तुमचा मेंदू दुय्यम दर्जाच्या दुकानातील क्लिअरन्स सेलमधून घेतला आहे का, त्यांनी तुम्हाला असे शिकवले आहे का की वडिलांनी केलेल्या कृत्याबद्दल मुलाला दोषी किंवा जबाबदार धरले पाहिजे, तुम्ही वकील आहात का, तुम्हाला विधी महाविद्यालयात असेच शिकवले आहे का, तुम्हाला शुभेच्छा...

'दहा रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस'

अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेकांनी त्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. पाकिस्तानी वंशज असलेल्या सेलिब्रिटीला पद्मश्री कसा काय दिला जाऊ शकतो, असेही प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली. राज्याचे अल्पसंख्याक विकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानात कोणी जय मोदी असा जप केला तर त्यालाही भारतीय नागरिकत्वासह पद्मश्री पुरस्कार दिला जाईल. अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देणे हा भारतीय नागरिकांचा अपमान आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:famous singers of pakistan origin adnan sami asked those who questioned padma shri award from where did you bring your mind