पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Family : एकाही कलाकारानं घराबाहेर न पडता असा चित्रीत केला लघुपट

फॅमिली

देशभरातील चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूविषयी जनजागृती करणारी एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. प्रियांका चोप्रापासून ते सोनाली कुलकर्णी, महानायक अमिताभ बच्चनपासून ते थलायवा रजनिकांतपर्यंत सर्व कलाकार या शॉर्टफिल्ममध्ये पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे ही शॉर्ट फिल्म चित्रीत करण्यासाठी एकही कलाकार घराबाहेर पडलेला नाही.

तर आज 'जब वी मेट'मध्ये शाहिदऐवजी दिसला असता हा अभिनेता

आम्ही एक छोटीशी फिल्म तयार करण्यासाठी घराबाहेर पडलो नाही तर तुम्ही देखील घराबाहेर पडू नका, घरातच थांबा आणि कोरोनाला दूर  ठेवा असा संदेश कलाकारांनी दिला आहे. या शॉर्टफिल्ममध्ये अमिताभ बच्चन, रजनिकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, दिलजित दोसांज, चिंरजीवी, शिव कुमार, मोहन लाल, सोनाली कुलकर्णी यासारखे बॉलिवूड, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार पहायला मिळत आहेत. 

सूडानं पेटलेल्या 'बेगम'ची गोष्ट

कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकानं घरात थांबा, स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्या असा संदेश कलाकारांनी दिला आहे. येणाऱ्या काळातील संकटावर आपल्याला एकत्र येऊन मार्ग काढायचा आहे असा संदेशही कलाकारांनी दिला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Family Amitabh Bachchan Ranbir Kapoor and Alia Bhatt lead film industry in unique short film