'बॉलिवूडचा सिरिअल किसर' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इम्रान हाश्मी त्याच्या अलिशान कारमुळे चर्चेत आला आहे. इम्राननं आपल्या नव्या कोऱ्या अलिशान कारसाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत. या अलिशान कारचा थाट पाहण्यासारखाच आहे.
या कारची किंमत ५.६५ ते ६.२८ कोटींच्या घरात आहे. या कारचा वेग १०० किलोमीटर प्रती ३ सेकंद असा आहे. इम्रानचे या कारसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. पिवळ्या रंगाची ही Lamborghini Aventador सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
लवकरच इम्रान नेटफ्लिक्सच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजमधून वेबविश्वात पदार्पण करत आहे. ही सिरीज येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज लेखक बिलाल सिद्धीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सिरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
त्याचप्रमाणे इम्रान त्याचा आगमी चित्रपट ‘चेहरे’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.