पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांनी दिलेली ती शिकवण आजही स्मरणात

एकता कपूर

सुषमा स्वराज या सर्वसामान्य जनतेच्या आवडत्या नेत्या होत्या. सोशल मीडियाद्वारे त्यांचा जनसंपर्क तितकाच कौतुकास्पद होता. परराष्ट्रमंत्री असताना अनेकाच्या मदतीला त्या धावून गेल्या आहेत. त्यांच्या निधनानं सारा देश हळहळला. कला, क्रीडा, राजकारण विश्वातून त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माती एकता कपूर हिनं देखील स्वराज यांच्या आठवणीला उजाळा  दिला. स्वराज यांनी दिलेली शिकवण मी कायमच स्मरणात ठेवली असं ती म्हणाली. 

सेटवर येऊन दिले होते आशीर्वाद, रितेशनं सांगितली सुषमा स्वराज यांची आठवण

माझ्या उमेदीच्या काळात सुषमा स्वराज यांच्याकडून मला खूप पाठिंबा मिळाला. त्यांच्या हस्ते मला बक्षीस देण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी मला एक शिकवण दिली होती. एक महिलेनं दुसऱ्या महिलेच्या प्रगतीसाठी नेहमीच हातभार लावला पाहिजे, महिलांनी एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे ही शिकवण त्यांनी मला दिली होती. माझ्या आयुष्यातील ही पहिली आणि महत्त्वाची शिकवण होती.  त्याच्या जाण्यानं मला  दु:ख झालं, असं ट्विट एकता कपूर हिनं केलं आहे. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचे भावस्पर्शी ट्विट

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात स्वराज यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना साडेनऊ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.