पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकता कपूरनं नवोदित दिग्दर्शकाला भेट दिली आलिशान कार

एकतानं दिग्दर्शकाला भेट दिली आलिशान कार

दिग्दर्शक, निर्माती एकता कपूरनं नवोदित दिग्दर्शक राज शांडिल्यला एक आलिशान कार भेट दिली आहे. राजच्या कामावर खूश होऊन एकतानं ही  भेट दिली आहे. एकतासाठी २०१९ हे वर्ष सुपरडुपर हिट ठरलं. वेब विश्वातही एकताचा बोलबाला पाहायला मिळला. एकताची  निर्माती संस्था असलेल्या बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या  'ड्रीम गर्ल' चित्रपटानं घवघवीत यश मिळवल्यानंतर एकतानं राजला महागडी कार भेट म्हणून दिली आहे. 

१७ वर्षांनी येतोय 'हंगामा २', परेश- शिल्पा दिसणार मुख्य भूमिकेत

राज शांडिल्यनं 'ड्रीम गर्ल'चं दिग्दर्शन केलं आहे. सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं १०० कोटींहूनही  अधिकची कमाई केली. आयुष्मान खुराना आणि नुसरत भारुचाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आयुष्यमानचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांचीही या चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळाली.  

'दबंग ३'च्या टीमनं साजरा केला सई मांजरेकरचा वाढदिवस, आई झाली भावूक

यापूर्वी एकतानं 'एक विलेन'  चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरीला आलिशान कार गिफ्ट दिली होती. 'एक विलेन'नं १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवल्यानंतर एकतानं मोहितला ही कार भेट म्हणून दिली होती.