पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'ची बॉक्स ऑफिसवर चलती

आयुष्मान खुराना

आयुष्मान खुरानाच्या  'ड्रिम गर्ल'ची सध्या चर्चा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. पहिल्या तीन दिवसांत अल्प बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं ४० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. 

या चित्रपटानं पहिल्या दिवशी ९.५ कोटी, दुसऱ्या दिवशी १६ कोटी  आणि तिसऱ्या दिवशी १८ कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत चित्रपटानं एकूण ४४.५७ कोटींची  कमाई केली आहे. 

जोडीदाराची खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्यांना नेहाचं सडेतोड उत्तर

विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा हा आयुष्मानचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यापूर्वी  आयुष्मानच्या 'बधाई हो' चित्रपटानं ३२ कोटी, 'आर्टिकल १५' ने १९.८४ कोटी आणि 'अंधाधून'नं १४.६४ कोटींची कमाई केली.

साधरणत: अनेक बॉलिवूड चित्रपट हे मुंबई, दिल्ली सारख्या शहरात चांगली कमाई करतात. मात्र आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'नं म्हैसूर, पंजाब, बिहारमधूनही चांगली कमाई केलेली पाहायला मिळत आहे. 

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत