पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. अमोल कोल्हेंची महाघोषणा, तीन शिवकालीन चित्रपटाची करणार निर्मिती

शिवप्रताप

खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. ते देशभरातील तमाम प्रेक्षकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची कथा घेऊन येत आहेत. डॉ. अमोल कोल्हेंची निर्मिती संस्था जगदंब ही 'शिवप्रताप' या तीन चित्रपट मालिकांची निर्मिती करणार आहे.  त्यातला पहिला चित्रपट हा पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे.

'बंटी और बबली २' मध्ये दिसणार सैफ -राणीची जोडी

'शिवप्रताप' या चित्रपट मालिकेअंतर्गत 'वाघनखं', 'वचपा', 'गरूडझेप' या तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातला पहिला चित्रपट हा 'वाघनखं' असणार आहे. हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटानंतर  'वचपा' आणि 'गरूडझेप' हे दोन चित्रपट प्रदर्शित होतील. 

अमोल कोल्हेंनी एका कार्यक्रमात ही महाघोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेल्या अमोल कोल्हेंच्या जगदंब निर्मिती संस्थेनं 'स्वराज्य रक्षक संभाजी', ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या दोन मालिकांची निर्मीती केली आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत अमोल कोल्हे स्वत: अभिनय करत आहे. 

प्रियांकाच्या लग्नातून उमेद भवन पॅलेसला मिळाले ३ महिन्यांचे उत्पन्न