पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वराज्यरक्षक संभाजी : पवारांना यात गोवण्याचा प्रयत्न हीन दर्जाचा

स्वराज्यरक्षक संभाजी

'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, मात्र ही मालिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या दबावामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर  मालिकेतील प्रमुख अभिनेता आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  पवारांना यात गोवण्याचा दुर्दैवी आणि  हीन दर्जाचा प्रयत्न होत आहे. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. अशा अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कारवाई करण्याची मागणी  मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई पोलिसांकडे केली असल्याचं डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. 

भावाच्या लग्नातला करिना-करण- करिष्माचा 'बोले चुडिया' डान्स व्हायरल

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. मात्र ती शरद पवारांच्या दबावामुळे बंद होत आहे असा अपप्रचार करणं हीन दर्जाचं असल्याचं कोल्हे म्हणाले.

रजनीकांतच्या 'दरबार'मुळे मोठा तोटा, वितरकांचं उपोषण

''पवारांना यात गोवण्याचा दुर्दैवी आणि  हीन दर्जाचा प्रयत्न होत आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. पवार यांचा कलाक्षेत्राविषयीचा दृष्टीकोन सर्वांनाच ठावूक आहे. मी राष्ट्रवादीत कार्यरत झाल्यापासून पवारांनी मालिकेत हे दाखवा किंवा हे दाखवू नका असं कधीही मला सांगितलं नाही. याउलट काम करताना काही अडचणी येत नाही ना याची पवारांनी आपुलकीनं चौकशी केली. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये तत्थ्य नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. '' असं अमोल कोल्हे म्हणाले. 

अब्जाधीशही तेच कपडे पुन्हा वापरतात, इशावर कौतुकांचा वर्षाव